
मुंबई येथील मंत्रालय (Mantralaya Mumbai).. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. राज्यभरातून लोक आपापली कामं घेऊन मंत्रालयात धडकत असतात. प्रत्येकाचे नाना प्रश्न अन् तऱ्हेतऱ्हेच्या समस्या. या सगळ्यांची सोडवणूक होईल असे ठिकाण म्हणजे मंत्रालय, अशी भावना घेऊन लोकांचे लोंढे मंत्रालयात येत असतात. यात पाणीटंचाईनं ग्रासलेल्या ग्रामीण भागातील लोकांचाही भरणा असतो. पण त्यांना कुठे माहिती आहे. स्वत: मंत्रालयच पाणीटंचाईग्रस्त (Water Shortage in Mantralaya) आहे. होय, अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आहे. अधिवेशन संपून काहीच तास उलटले असतील इतक्यात मंत्रालय आवारात पाण्याची प्रचंड टंचाई असल्याचे पुढे आले आहे.
कर्मचारी, अधिकारी, नागरिकांचे हाल
मंत्रालय इमारत कँटीनमध्ये पाणी नाही. इतकेच नव्हे तर मंत्रालयातील शौचालयांमध्येही पाणी नाही. राज्यभरातून आलेले लोक मंत्रालयात कॅन्टीनमध्ये भोजन करत असतात. पण, कॅन्टीनमध्ये हात धुवायलाही पाणी नाही. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रालयात पाठिमागील दोन दिवसांपासून पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. पाण्याचा हा तुटवडा नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे,याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. मंत्रालयाच्या पाणीपुरवठ्यास जबाबदार असलेल्या विभागाकडूनही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहती देण्यात आली नाही. (हेही वाचा, Mumbai: मुंबईच्या मंत्रालयात सुरक्षा जाळीवर व्यक्तीने इमारतीवरून मारली उडी; चौकशी सुरु (Video))
पाणी कपातीबात आगाऊ सूचना नाही
मंत्रालयातील कर्मचारी, अधिकारी आणि इतर नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे प्रशासन या समस्येवर काय तोडगा काढते याबाबत उत्सुकता आहे. राज्याच्या मंत्रालयातच पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होत नसेल तर, सरकारच्या इतर कार्यालय आणि गावखेड्यांमध्ये काय स्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी प्रतिक्रिया मंत्रालयात कामासाठी आलेले नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, कधी कधी जलवाहीनिशी संबंधीत किंवा काही तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा खंडीत केला जातो. अशा वेळी आगाऊ सूचना देऊन नागरिक आणि संबंधितांचे हाल होऊ नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते. असे असले तरी, अशा प्रकारची कोणतीही खबरदारी मंत्रालयातील पाणीटंचाईमागे नसल्याचे समजते आहे. (हेही वाचा: School Bus New Guidelines: खासगी शाळांसाठी विद्यार्थी बस वाहतूक नियमावली, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी)
कर्मचाऱ्यांना हात धुण्यासही नाही पाणी
पाण्याची मागणी उपलब्ध पुरवठ्यापेक्षा जास्त झाल्यावर किंवा पाण्याचे स्रोत कमी झाल्यामुळे किंवा दुर्गम झाल्यास पाण्याची कमतरता उद्भवते. दुष्काळ, असमान पर्जन्य वितरण आणि नद्या किंवा भूजल स्रोत कोरडे पडणे यासारख्या नैसर्गिक घटकांमुळे हे उद्भवू शकते. अतिवापर, प्रदूषण, खराब पाणी व्यवस्थापन आणि लोकसंख्या वाढ आणि औद्योगिक विस्तारामुळे वाढत्या मागणीमुळे मानवी क्रियाकलाप देखील कारणीभूत ठरतात.
ही समस्या शेती, आरोग्य, ऊर्जा उत्पादन आणि एकूण राहणीमानावर परिणाम करते, विशेषतः ज्या भागात पाणी आधीच मर्यादित आहे. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेकदा पाण्याचा पुनर्वापर करणे, साठवणूक आणि वितरण प्रणाली सुधारणे आणि जबाबदार वापराला प्रोत्साहन देणे यासारख्या शाश्वत पद्धतींचा समावेश असतो.