पुणेकरांनो इकडे लक्ष द्या. तुमचा व्हॅलेंटाईन मूड काहीसा बदलवणारी बातमी आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील विविध ठिकाणी पाणीपूरवठा खंडीत (PMC Water Cut) करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या ( Pune City) महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत विविध भागात फ्लो मिटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात 15 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा नियमीतपणे सुरु होईल. मात्र, पाण्याचा दाब कमी राहणार असल्याने कमी दाबाने पाणिपुरवठा सुरु राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे. त्यामुळे संभाव्य गैरसोय टाळायची असेल तर आजच पाण्याचे योग्य प्रमाणात आणि पुरेसे नियोजन करुन ठेवा. शक्य असल्यास पर्यायी व्यवस्था करा. जेणेकरुन आपणास पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.
पाणीपुरवठा कपातीचे भाग आणि वेळापत्रक खालील प्रमाणे
सणस पंपिंग स्टेशन- नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी. 10 ते बी 14
चतुर्श्रुंगी GSR inlet Flow Meter 1200 mm, सिपोरेक्स खडकी लाईन 250 मिमी- दिनांक 16 फेब्रुवारी रोजी बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औध, खडकी अॅम्युनेशन फॅकेटरी, अभिमानश्री सोसायटी (हेही वाचा, World Water Day 2019: धोका ओळखा, पाणी वाचवा; अन्यथा पृथ्वीवर जीवसृष्टीचा विनाश अटळ)
पद्मावती GSR- दिनांक 16 फेब्रुवारी रोजी बिबेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानंगर , संभाजीनगर, काशिनाथ पाटील नकर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँक नगर, लेक टाऊन, गंगाधाम, बिबवेवावडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस फ्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.
नवीन कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र व रामटेकडी खराडी नोबल हॉस्पीटल- दिनांक 16 फेब्रुवारी ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडींग सेंटर, फरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा
ट्विट
पाणीपुरवठा बंद सुचना.
पाणीपुरवठा बंद असणारे भाग जाणून घेण्यासाठी https://t.co/bL73K0qHYl या लिंकला भेट द्या.#PMC #NoWaterSupply #NoWater #Pune pic.twitter.com/OiFKefItCn
— PMC Care (@PMCPune) February 14, 2023
पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी महापालिका अनेक उपाययोजना करत असते. कधी कधी या उपाययोजना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी, संभाव्य नुकसान, संकट टाळण्यासाठी तर कधी त्या त्या काळात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी आणि व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठीही राबवल्या जातात.