Accident (PC - File Photo)

राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गाडी चालवताना वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे हे अपघात घडत असल्याचे समोर येत आहे. वाशिममध्ये देखील असाच एक मोठा अपघात घडला आहे. वणीच्या गडावरून शेगाव येथे दर्शनाकरिता नायगावकर कुटुंब जात असताना हा अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात झाला (Shegaon) असून यातून नायगावकर कुटुंब थोडक्यात बचावले आहे. या अपघातात कारमधील 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.  (हेही वाचा -Hingoli Car Accident: कारवरील नियत्रंण सुटल्याने अपघात, क्षणातचं आई वडिलांना गमावलं; हिंगोली येथे भीषण अपघात)

वाशिममध्ये कारंजा - दारव्हा मार्गावर बोदेगाव ते सावंगीच्या मधोमध नदीच्या पुलाजवळ भरधाव ट्रकने कार्ल धडक दिली. या अपघातात कारमधील उषा नायगावकर (वय 55), अबोली नायगावकर (वय 23), आनंद नायगावकर (वय 37), अशोक नायगावकर (वय 67), राकेश गडमवार (वय 50) हे पाचही गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने कारमधील तीन वर्षाच्या मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले.