Hingoli Car Accident: कारवरील नियत्रंण सुटल्याने अपघात, क्षणातचं आई वडिलांना गमावलं; हिंगोली येथे भीषण अपघात
हिंगोली येथे एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळली आहे. रविवारी सकाळी हा अपघात झाला आहे.
Hingoli Car Accident: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एका कारचा अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी डिव्हायडरला धडकल्याने कारचा अपघात झाला आहे. कार मध्ये पती पत्नी आणि त्यांचा मुलगा उपस्थित होता. अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिची पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील कळमनुरी परिसरातील शिवनी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. कारचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. तर या कारमधील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आणि त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. डिव्हायजरला धडकल्याने कारने तीन चार वेळा पलटी घेतली. जयप्रकाश कावरखे आणि मंजुषा कावरखे असे मयत शिक्षक पती पत्नीचे नावं आहे. तर पराग कावरखे असे जखमी मुलाचे नाव आहे.
नांदेडहून कावरखे कुटूंब कारने कळमनुरीच्या दिशेने येत होते. अचानक मुलाचा कारवरील नियत्रंण सुटल्याने कार थेट डिव्हायडरला धडकली आणि तीन ते चार वेळा पलटली. दरम्यान पती आणि पत्नीला या अपघातात गंभीर जखमा झाल्या, त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलगा गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार पलटल्याने कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

