टाळी कधीचं एका हाताने वाजत नाही ही म्हणं आयुष्यात एकदा तरी तुम्हाला नक्कीच कुणी तरी ऐकवली असेल आणि होते ते खरंही आहे असं आता पर्यत आपल्याला वाटायचं. पण आपला हा गैरसमज मोडून काढत पढ्ढ्यानं थेट स्वतचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book Of Record) नोंदवलं आहे. हो ऐका हाताने टाळी वाजू शकते हे ऐकायला जरी विचित्र वाटतं असलं तरी हो हे खरं आहे आणि हे खरं करुन दाखवलयं वर्धेच्या (Wardha) रोशन लोखंडेने (Roshan Lokhande). अवघ्या 30 सेकंदात तब्बल 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजवणारा हा भारतातील पहिला व्यक्ती असल्याने रोशनची थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागा कमवत त्याने आपल्या नावी विक्रम नोंदवला आहे. रोशन त्याचा हात कोपऱ्यापासून सरळ रेषेत ठेवत हाताचा पंजा तळव्याकडे झुकवतो आणि तळव्याच्या शेवटी बोटे एकमेकांवर आदळून एका हाताने टाळी वाजवली जाते. अन् अशा प्रकारे एका हातानेच टाळी वाजते!'
रोशन (Roshan Lokhande) जेव्हा अशा पध्दतीने टाळी बाजवायचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याला आजूबाजूचं लोक हसायची. पण आता एका हाताने वाजणाऱ्या टाळीमुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book Of Record) विक्रम नोंदवल्यानंतर आता रोशनसाठी दोन हातांनी टाळ्या बाजवत आहे. हल्ली तरुण फार उत्साही किंवा नवनवीन गोष्टी करण्यास उत्सुक असतात. यातूनच रोशनेने प्रयत्न केल्याचं रोशनने सांगितलं आहे. (हे ही वाचा:- Mumbai: मोठी कामगिरी! अरबी समुद्रात 36 किलोमीटर पोहून कीर्तीने जागतिक विक्रमाची केली नोंद (Watch Video))
रोशन एका हाताने टाळी वाजवतो हे बघून त्याचे मित्र किंवा गावकरी यांच्यासह अनेकांनी एकाच हाताने टाळी वाजवून बघण्याचा प्रयत्न करतान दिसत आहेत. पण हे वाटत तेवढं सोप नाही. त्यात एका हाताने ३० सेकंदात १८० टाळ्या काय दोन हातांनी देखील हे करणं अवघड आहे.