मुंबई: साेलापूरची 16 वर्षीय जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडियाने (Kirti Nandkishore Bharadia) अरबी समुद्रात लगातार 6 तास पोहत 38 किलोमीटरचे अंतर गाठण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. तिने गुरुवारी हा विश्वविक्रम केला. तिने सकाळी 12 वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून तिने पोहायला सुरुवात केली आणि सायंकाळी 7.22 वाजता गेट वे आॅफ इंडियापर्यंत आली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कीर्तीने सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावात दररोज आठ तास सराव केला. गेल्या दीड महिन्यापासून मुंबई येथील समुद्रात सुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.
पहा व्हिडीओ
सोलापूरच्या कीर्ती भराडियाने मुंबईच्या समुद्रात सलग ३६ कि. मी. अंतर ७ तास २२ मिनीटात पार केले. तिचा हा जागतिक विक्रम सुरू असतानाचा व्हिडिओ#जागतिक_विक्रम #कीर्ती pic.twitter.com/E8ooSJya0g
— sanjay pathak (@Sanjay_pathak1) November 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)