दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या आंदोलनासाठी संयुक्त किसान मोर्चाने 23 ते 26 जानेवारी या कालावधीत आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील सर्व राज्यांच्या राज्यपाल भवनांवर (Raj Bhavan) आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी येत्या 23 जानेवारीपासून वाहन मोर्चा (Vehicle March) मुंबईच्या दिशेने निघनिघ
शेतकरी आंदोलनासोबतच येत्या 18 जानेवारीला देशभर 'किसान महिला दिवस' साजरा करण्यात येणार आहे. 13 ते 15 जानेवारी या काळात देशभरात लाखो शेतकरी आणि श्रमिकांनी कृषी कायद्याची होळी केल्याचेही संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा व्यापक एल्गार पुकारत आहे. हे आंदोलन नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीपासून म्हणजेच येत्या 23 तारखेपासून सुरु होणार आहे. (हेही वाचा, Anna Hazare Letter to Narendra Modi: अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्ली येथे करणार आंदोलन)
शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकार यांच्यात कृषी कायद्यावरुन निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. ही समिती अर्थहीन आहे. कारण या समितीतील सदस्यांनी या आधिच कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने या समितीसमोर या समितीसमोर न जाण्याच घेतलेल्या निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संघटना
- अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र)
- कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र)
- जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र)
- नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र)
- हम भारत के लोग (महाराष्ट्र)
आंदोलनाचे स्वरुप
संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध समविचारी किसान, कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येत राज्यातील विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिकांसह मुंबईच्या दिशेने निघतील. ही वाहने 23 जानेवारी रोजी निघतील. सर्व वाहने 24 जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानात जमतील. व 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता राज भवनाच्या दिशेने कूच करतील. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल.
-