एका बाजूला, पेट्रोल-डिझेल, गॅस अशा इंधन दरांनी जोरदार उच्चांक गाठला असताना दुसऱ्या बाजूला खाद्यतेल आणि भाजीपालाही जोरदार महागला (Vegetable Prices) आहे. भाजीपाल्याचे दर प्रतिदिन नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहेत. आता तर बाजारात भाज्यांची आवकच घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर सऱ्हास शंभरीपार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे मासीक बजेट बरेच कोलमडले आहे. या महागाईचे वर्णन करताना लोक 'महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे' अशी करु लागली आहे.' टोमॅटो, मिरची, कोबी, शेवगा शेंग, शेपू, वांगी अशा भाज्यांना चांगला दर मिळू लागला आहे.
राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणवर घटली आहे. परिणामी शेतातील भाजपाल्याला चांगला भाव मिळू लागला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात होणारी आवक. यामुळे बाजारत भाजीपाल्याला मोठी मागणी असत नव्हती. मात्र, मधल्या काळात आलेले कोविड संकट, नैसर्गिक अपत्ती आदी कारणांमुळे भाजीपाल्याचे उत्पादन मुळातच कमी झाले. सहाजिकच भाज्यांचे दर कडाडले. यातील एक समाधानाची बाब अशी की भाज्यांचे दर महागल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना बराच चांगला फायदा मिळत आहे.
दरम्यान, या वेळी कांदा उत्पादक शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याने उत्पादीत केलेल्या कांद्याला हवा तसा दर मिळत नाही. त्यामुळे उत्पादित केलेल्या कांद्याचे करायचे काय? याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.