विद्यार्थ्यांवर परीक्षा आणि ठराविक मार्क्स मिळवण्याचा कायम दबाव असतो. काही दिवसातच दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या परीक्षा विद्यार्थ्यांचं करियर ठरवत असल्याने त्यामध्ये अव्वल मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा असते. मात्र या स्पर्धेचा ताण असह्य झाल्याने दहावीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.
चाचणी परीक्षेत गुण कमी पडल्याने भीतीपोटी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात पालक नसताना या विद्यार्थ्याने सिलिंगच्या फॅनला लटकून जीव संपवला. हा विद्यार्थी चेंबूरच्या एका शाळेमध्ये शिकत होता. SSC च्या विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार; हॉल तिकीट हरवल्यास काय कराल?
चेंबुर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्याच्या आईवडीलांना मानसिक धक्का बसला आहे. दहावी - बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अशा काळात भीतीपोटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.