Ramdas Athawale (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा (Coronavirus) वाढता धोक पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. दरम्यान, केंद्रीय समाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोनामुळे महाराष्ट्राची स्थिती बिघडली आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) राज्याची परिस्थिती अधिकच बिघडविली आहे, असे आठवले म्हणाले आहेत.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याचपार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी आज भाजपा-रिपाइं मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघाचा दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीतील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तर, उमेदवार समाधान अवताडे यांना विजयी करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्र्यांचा कल लॉकडाऊनच्या दिशेने आहे, मात्र अद्याप काही निर्णय झाला नाही- चंद्रकांत पाटील

रामदास आठवले यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात आज 55411 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 53005 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2748153 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 536682 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.18% झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.