Ramdas Athawale On Sonia Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ते महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आठवले यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी यांचा विदेशी वंशाचा मुद्दा गैरलागू आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या जर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकता तर सोनिया गांधी या भारताच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? असे रामदास आठवले यांनी म्हटलेआहे. 2004 मध्ये युपीएची सत्ता असताना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायला हवे होते, असे आठवले यांनी सांगितले. तसेच, शरद पवार यांना पंतप्रधान करायला हवे होते, असेही ठावले यांन सांगितले.

रामदास आठवले यांनी म्हटले की, सोनिया गांधी या 2004 मध्ये पंतप्रधान बनू शकत होत्या. जर त्यांना पंतप्रधान व्हायचे नव्हते तर त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करायला हवे होते, असे रामदास आठवले यांनी म्हटले. इंदौर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले बोलत होते. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारमधील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी म्हटले की, भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या जर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होत असतील तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? सोनिया गांधी या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत. लोकसभेच्या खासदार आहेत. त्या पंतप्रधान बनू शकतात. (हेही वाचा, Narayan Rane Vs Shiv Sena: नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एक लोकनेते आहेत. ते पंतप्रधान पदाचे नेहमीच उमेदवार राहिले आहेत. आठवले यांनी म्हटले की, डॉ मनमोहन सिंह यांच्या ऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान बनवायचे होते. परंतू, सोनिया गांधी यांनी तसे केले नाही. जर 2004 मध्ये शरद पवार पंतप्रधान असते तर आज काँग्रेस भक्कम असते. काँग्रेस पक्ष स्वत:ला अनिश्चिततेतून बाहेर पडता आले असते.

ट्विट

शरद पवार यांनी 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध केला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबीत केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी तारीक अन्वर, पीए संगमा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. दरम्यान डॉ. मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने काँग्रेसचा मोठा पराभव करत स्वबळावर लोकसभेत मुसंडी मारली. भाजपने ही निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखली लढली होती.