Photo Credit- X

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राज्यसभेसाठी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. निकम यांच्यासोबतच डॉ. मीनाक्षी जैन, हर्षवर्धन श्रृंगला आणि सी. सदानंदन मास्टर यांच्याही नावाची घोषणा झाली आहे. उज्ज्वल निकम हे निष्णात वकील आहे. मुंबई मध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कसाब हा एकमेव जीवंत पकडण्यात आलेला आतंकवादी होता. त्याला फाशीची शिक्षा देण्यामध्ये निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात त्यांनी काम केले आहे.

उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणूकीमध्ये आपलं नशीब आजमावले होते पण उत्तर मध्य मुंबईत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी त्यांना कडवी झुंज देत पराभूत केले होते. त्यामुळे निवडणूकीत पराभूत झालेल्या निकमांचे आता राज्यसभेच्या माध्यमातून खासदार म्हणून पुर्नवसन होत आहे.

उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

उज्ज्वल निकम वकील हे सरकारी वकील म्हणून काम करत असल्याने त्यांच्या नियुक्तीवर कॉंग्रेसने यापूर्वीच प्रश्नचिन्ह उभं केले होते. लोकसभेनंतरही 12 दिवसांतच उज्ज्वल निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. भाजप उमदेवाराला सरकारी वकील करता येणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेसने मांडली आहे.

उज्ज्वल निकम यांच्याप्रमाणे अन्य नामनिर्देशितांमध्ये हर्षवर्धन श्रृंगला हे माजी परराष्ट्र सचिव तर, सदानंद मास्टर हे केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण तज्ज्ञ आणि मीनाक्षी जैन या प्रसिद्ध इतिहासकार यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती राज्यसभेवर जास्तीत जास्त 12 सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात आणि हे नामनिर्देशित साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील असतात. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात चार जागा रिक्त होत्या. त्यांच्यासाठी आज या नावांची घोषणा करण्यात आली आहे.