Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस; यावेळी शिवसैनिकांकडून पुष्पगुच्छ नाही, मागितली 'ही' खास भेट
Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) आहे. ठाकरे आज 62 वर्षांचे होणार आहेत.  मात्र, यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून पुष्पगुच्छ ऐवजी खास भेट मागितली आहे. ठाकरे यांनी यावेळी त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ नको आहे, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र हवे आहे की, त्यांचा पक्षावर विश्वास आहे आणि जास्तीत जास्त लोकांना पक्षाचे सदस्य म्हणून जोडू असे त्यांनी आपल्या शिवसैनिकांना सांगितले आहे. किंबहुना, यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या अशा मागणीचे योग्य कारण स्पष्टपणे दिसत आहे कारण काही दिवसांपूर्वी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे त्यामुळे पक्षात पुन्हा असे प्रकार घडू नयेत, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून आणि शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुंख्यमत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरें याचां आज वाढदिवस असल्याने आज अनेक शिवसौनिक आणि राजकीय नेते त्यानां वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरें यानां वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी ट्ववीट केले आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.... (हे देखील वाचा: Uddhav Thackeray Interview Part 2: महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून शरद पवारांचा शिवसेना संपवण्याच्या प्लॅन असल्याच्या बंडखोर आमदारांच्या दाव्यावर पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे)

उद्धवर ठाकरेंनी भाजप आणि राज ठाकरेंवर साधला निशाणा

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पक्षातील पूर्वीच्या बंडखोरीप्रमाणे यावेळच्या बंडखोरीचे उद्दिष्ट शिवसेनेला संपवणे हे आहे. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करत आहे, तर भाजप आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाचा वापर करत आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही नाव न घेता टोला लगावला, ज्यांनी गरज पडल्यास शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना त्यांच्या पक्षात विलीन होण्याचा विचार करू असे सांगितले होते.