Uddhav Thackeray Interview Part 2: महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून शरद पवारांचा शिवसेना संपवण्याच्या प्लॅन असल्याच्या बंडखोर आमदारांच्या दाव्यावर पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
सामना मुलाखत । PC: Twitter

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची राज्यात सत्तांतर झाल्यानंतरची पहिलीच मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज त्याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकार शिवसेनेच खच्चीकरण करणारे आहे. शरद पवार यांनी शिवसेनेला संपवल्याचा दावा केला होता त्यावरही आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊतांच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरेंनी हसून प्रतिक्रिया देताना शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात याच मंडळींनी भाजपा काम करायला देत नाही असं म्हणत राजीनामा दिल्याची क्लिप आहे. हा प्रकार एका सभेतील असून माझ्यासमोरचं झाल्याचं सांगत बंडखोर आमदारांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान सूरतेला उद्धव ठाकरे गेले असते तर चित्र वेगळं असतं का? या प्रश्नावर बोलताना ठाकरेंनी 'माझ्या मनात पाप नव्हतं. त्यांना वारंवार समोर येऊन बोलण्याचं आवाहन केलं होतं' असेही ते म्हणाले आहेत. Uddhav Thackeray Interview Live streaming: शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच मुलाखत, कुठे पाहाल?

निधीवाटपामधील दूजाभावाच्या आरोपांवर बोलताना उद्धव ठाकरेंनी काही ठिकाणी असामनता आढळली तेव्हा हस्तक्षेप करून तेथे स्थगिती दिली होती. अधिवेशन सुरू असताना अशोक चव्हाणांसोबत बसून काही प्रश्न सोडवले होते. इथे वाचा सविस्तर मुलाखत!  

उद्धव ठाकरे आता ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. या दौर्‍यात नेते मंडळी देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. सध्या पक्षाची सदस्य नोंदणी मोहिम सुरू आहे. त्याच काम झाल्यानंतर राज्याचा दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.