Uddhav Thackeray Interview Live streaming:  शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच मुलाखत, कुठे पाहाल?
Uddhav Thackeray And Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

Uddhav Thackeray Interview: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर विस्तृतपणे जाहीर बोलणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. तरीही त्यांची विस्तृत अशी भूमिका पुढेआली नव्हती. ही भूमिका आज पुढे येणार आहे. दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत आज (26 जुलै) प्रसारित होत आहे. हल्लाबोल, आसूड, गौप्यस्फोट यांनी ओतप्रोत भरलेली ही मुलाखत आपण इथे पाहू शकता. प्रामुख्याने शिवसेना बंडखोर आणि या गटाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला म्हणजेच, आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Uddhav Thackeray Interview Live streaming) आपण येथे पाहू शकता.

शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक उलतापालथी झाल्या. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पितापुत्रांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर पुन्हा एकदा भर दिला. शिवसेनेच्या शाखेपासून ते संपर्क प्रमुखांपर्यंत पक्ष भक्कम करण्यास सध्या प्राधान्य आहे. त्यामुळे शिवसेनाभवन आणि मातोश्री येथे सध्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध दौरे करुन वातावरण ढवळून काढत आहेत.

लाईव्ह स्ट्रीमिंग

संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज युट्युब आणि विविध प्रसारमाध्यमांतून आज प्रसारित होत आहे. संजय राऊत यांनी या मुलाखतीचा टीझर यापूर्वीच प्रसिद्ध केला आहे. हा टीझर पाहता ही मुलाखत दमदार होणार यात शंका राहिली नाही. या मुलाखतीत शिवसेनेतेली बंड आणि इतर बऱ्याच गोष्टीवर सडेतोड भाष्य होईल असे अपेक्षीत आहे.

संजय राऊत यांनी या मुलाखतीचे दोन टीझर या आदी प्रकाशित केले आहेत. त्या टीझरमध्ये त्यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे की, या मुलाखतीतून अनेक प्रश्नांची प्रश्नांची सडेतोड उत्तरं मिळतील. त्यामुळे या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.