Nitesh Rane On Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Nitesh Rane on Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरुद्ध एक शब्दही बोलणार नाही, असे सांगणाऱ्या शिंदे गटातील आमदारांनी आता थेट आरोप करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना सुरक्षा नाकारली, असा आरोप माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केला. नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनीही तसाच आरोप केला. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांची सुपारी दिली होती. आम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत. योग्य वेळ येताच 'वस्त्रहरण' करु असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जसे एकनाथ शिंदे.. तसेच.. माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही त्यांना संपविण्यासाठी तथाकथीत, विवेकी आणि सभ्य शिवसेना पक्षप्रमुखाने सुपारी दिली होती. म्याव म्याव संपू दे.. मग आपण व्याजासह “वस्त्रहरण” सुरू करू, असेही नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. (हेही वाचा, Jayant Patil Court Warrant: जयंत पाटील यांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट; काय आहे प्रकरण? घ्या जाणून)

नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी यांच्या विधानाचा दाखला देत नितेश राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवानीशी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे हे कोणत्या मनोवृत्तीचे आहेत. हे उभ्या महाराष्ट्राला समजले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे घडले ते पुढे आले नाही. पण, त्याच्याही आगोदर ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्यासोबत असे घडत आले आहे. नारायण राणे यांचीही सुपारी देण्यात आली होती. यावर त्या वेळीच आपण पोलिसांमध्ये तक्रार का नाही दिली, असा सवाल विचरा असता नितेश राणे म्हणाले, आम्ही तक्रार करणारे लोक नाही आहोत. आम्ही योग्य वेळी येग्य उत्तरे देतो. त्यामुळे तक्रार केली नाही.