Devendra Fadnavis On Urdu Language: 'आम्ही उर्दू भाषेच्या विरोधात नाही', उद्धव ठाकरे यांच्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

Uddhav Thackeray Malegaon Sabha: उर्दू ही भारतीय भाषा आहे. या भाषेला आमचा कोणताही विरोध नाही. पण जे (उद्धव ठाकरे गट) इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आमचा विरोध आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मालेगाव येथे सभा पार पडत आहे. या सभेला उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी उर्दू भाषेत बोर्ड लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरे यांच्यावर करण्यात येत असलेल्या टीकेबद्दल प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांची सभा मालेगाव येथील एमएसजी कॉलेज मैदानावर ही सभा पार पडत आहे.

देवेंद्र फडणीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीय उर्दू देखील एक भाषा आहे आणि आम्ही तिच्या विरोधात नाही. जे इतरांना (उद्धव गट) खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाच आमचा विरोध आहे. याचे उत्तर उद्धव ठाकरेंना कधीतरी बाळासाहेब ठाकरेंना द्यावेच लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray Malegaon Sabha: उद्धव ठाकरे मालेगाव सभा, स्वागतासाठी 'उर्दू भाषेत' बोर्ड, 'जनाब' असाही उल्लेख; राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा पार पडते आहे. खेड येथील सभा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दमदार पाड पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. त्या जोरावर आज मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. खास करुन मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बोर्ड उर्दू भाषेत लागले आहेत. शिवाय उर्दू भाषेत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जनाब असाही करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सभेच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मालेगावमध्ये उर्दू भाषेत बोर्ड झळकले आहेत. यावर विरोधकांकडून जारदोर टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांचा जनाब म्हणूनही उल्लेख केला जातो आहे. यावर उर्दू ही भारतीय भाषा आहे. अनेक लेखक, कवी उर्दू भाषेतच लिहीतात. कौतुक केले जाते ते जावेद आख्तर, गुलजार हेसुद्धा उर्दू भाषेतच लिहीतात. त्यामुळे उर्दु भाषेत बोर्ड झळकल्याबद्दल कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.