महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) हे आज वयाच्या 60 व्या वर्षात पदार्पण करत आहेत, सध्या राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना संकटात आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव यांनी घेतला आहे. असं असलं तरी सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांनी व महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सहकारी नेत्यांनी ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव सुरु केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपल्या ट्विटर अकाउंट वरून खास ट्विट करत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तर काल रात्री बाराच्या ठोक्याला उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सामना चे संपादक, खासदार, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ये दोस्ती हम नही तोडेंगे म्हणत उद्धव ठाकरेंचे अभिष्टचिंतन केले आहे. या मंडळींनी दिलेल्या शुभेच्छांचे ट्विट आपण आता पाहणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असे म्हंटले आहे. तर अजित पवार यांनी उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा विश्वास व्यक्त करत ट्विट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट
Best wishes to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji on his birthday. I pray for Uddhav Ji’s long and healthy life. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2020
अजित पवार ट्विट
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life! @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/PlrNgNg508
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2020
संजय राऊत ट्विट
ये दोस्ती....
हम नही तोडेंगे...
आपण आमच्या आयुष्यात खास आहात...
आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..@uddhavthackeray @CMOMaharashtra pic.twitter.com/3HA5puJzBb
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 27, 2020
सुप्रिया सुळे ट्विट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.@CMOMaharashtra@OfficeofUT #filephoto pic.twitter.com/SKPaHlzKQd
— Supriya Sule (@supriya_sule) July 27, 2020
जितेंद्र आव्हाड ट्विट
महाविकास आघाडी चे प्रमुख नेते व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाचे औचित्य साधून गृहनिर्माण खात्याने माफक दरात 15,000 सदनिका 3 वर्षात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे
@OfficeofUT pic.twitter.com/HxtW0c7ZFb
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 27, 2020
रोहित पवार ट्विट
मुख्यमंत्री व @ShivSena पक्ष प्रमुख श्री. @OfficeofUT जी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! pic.twitter.com/YRnmAM8FPS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2020
अनिल देशमुख ट्विट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि @ShivSena पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे जी (@OfficeofUT) आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणाला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. pic.twitter.com/iV3Gmr5B4P
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 27, 2020
राजकारणाचा वारसा असलेल्या घरातून आले असले तरी उद्धव ठाकरे यांचा सक्रिय राजकारणातील हा नवा कार्यकाळ आहे, तरीही ज्या उमेदीने त्यांचे काम ते पार पाडत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे , अशा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेटेस्टली परिवाराकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा