महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या (Tuljabhavani) अलंकारांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) दिलेल्या दागिन्यांमधून काही दागिने गायब झाले आहेत. काही दिवसांपूर्वी केलेल्या मोजणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर आता कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी चौकशीची मागणी केली आहे.त्याबाबतचे पत्र देखील त्यांनी दिले आहे.
छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजापूरच्या देवीच्या दागिन्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. असे मौल्यवान दागिने गहाळ झाल्याने त्याची चौकशी व्हावी असं छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
भविष्यामध्ये दागिन्यांची मोजणी कॅमेर्यासमोर करावी. त्याचा अहवाल जारी करावा. आता गहाळ झालेल्या दागिन्यांवर चौकशी करण्याची देखील मागणी आइ दोषींना कडक शिक्षा करण्याचेही त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये पत्र देऊनही उचित कारवाई न झाल्यास स्वराज्य या त्यांच्या पक्षाकडून मोठं आंदोलन उभं केले जाईल असं सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: No Dresscode at Tuljapur Temple: तुळजापूर मंदिरामध्ये भाविकांसाठी जारी ड्रेसकोडचे निर्बंध मागे .
तुळजाभवानीचे दागिने विविध डब्ब्यांमध्ये ठेवले जातात. रीतीरिवाजानुसार ते वापरले जातात. मात्र एकूण डब्ब्यांमधील 8-10 दागिने गायब असल्याचा दावा करण्यात आला आहे.