Victoria Carriages पुन्हा दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर धावण्यास सज्ज; ट्रायल रन्सची सुरूवात
Animal Free Victoria Carriages (Photo Credits: Twitter)

दक्षिण मुंबई मध्ये पुन्हा एकदा लोकप्रिय Victoria carriages रस्त्यावर धावण्यास सुरूवात होणार आहे. परंतू या Victoria carriages आता घोड्यांशिवाय धावणार आहेत. घोड्यांच्या ऐवजी इलेक्ट्रिक बॅटरीजवर या चालवल्या जाणार आहेत. TOI च्या वृत्तानुसार, दक्षिण मुंबईमध्ये शनिवारी त्याची ट्रायल झाली आहे. आता Victoria carriages या Ubo Ridez कंपनीकडून चालवल्या जाणार आहेत. नक्की पहा: मुंबई: Victoria Carriages आता नव्या अंदाजात; आदित्य ठाकरे ने शेअर केली खास झलक (Watch Video).

ट्रान्सपोर्ट विभागाकडून या Victoria carriages दक्षिण मुंबईमध्ये पुन्हा चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एकेकाळी दशकभर घोड्यांसोबत धावलेली घोडागाडी आता गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये पुन्हा नव्याने धावण्यास सज्ज झाली आहे.

इलेक्ट्रिक वर धावणार्‍या Victoria carriages चा वेग हा ताशी 20 किमी पेक्षा देखील कमी असणार आहे. या व्हिटोरींचा लूक हा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे. एकावेळी त्यामध्ये 6 जण बसू शकतील अशी आसनव्यवस्था असणार आहे. दरम्यान मुंबईकर आणि पर्यटकांसाठि या Victoria carriages पुढील महिन्यापासून सज्ज होणार आहेत. सुरूवातीला 10 व्हिक्टोरिया कॅरिएज रस्त्यावर उतरवल्या जाणार आहेत. पूर्वी घोड्यांसह चालवल्या जाणार्‍या या Victoria carriages आता गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट्स आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्य्ये चालवली जाणार आहे.

मुंबई महानगर पालिकेने जानेवारी महिन्यात बीएमसी हेडक्वॉर्टर्स मध्ये हेरिटेज वॉकला सुरूवात केली आहे. त्यानंतर आता मुंबईकरांना दक्षिण मुंबईत या Victoria carriages मधून फिरता येणार आहे. जून 2015 साली मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांवर होणार्‍या अत्याचारातून मुक्तता करण्यासाठी घोडागाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता Victoria carriages बॅटरीवर धावणार असल्याने त्यांचं मुंबईकरांना आकर्षण असेल.