Pune Accident: मंचर जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, तिघे जण जळून खाक
Pune Accident PC Twitter

 Pune Accident:  पुण्यात मंचर जवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ ही घटना घडली. या भयावह घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कार- टेम्पो कंटेनरच्या धडकेत अपघात झाला आहे. ही घटना पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा येथे सकाळी घडली. या अपघातात सुदैवाने कार चालक आणि टेम्पो चालक बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. सकाळी एक स्विफ्ट कारमधून तीन तरुण पुणे नाशिक मार्गावरून जात होते अशी माहिती समोर आली आहे. ही कार मंचर येथे आली. मंचर येथे पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर बंद अवस्थेत उभा होता. दरम्यान बंद असलेल्या कंटनेरला टेम्पो आणि कारची धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाना आग लागली.  (हेही वाचा- जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील पंडाल कोसळला)

स्विफ्ट कारने क्षणाच पेट घेतला आणि या आगीत तीन मुलांचा जळून मृत्यू झाला. सुदैवाने कार चालक आणि टेम्पो चालक वेळीच उतरले त्यामुळे दोघे जण बचावले. अपघातानंतर मंचर रस्त्यावर बराच वेळ वाहतुकांची कोंडी झाली होती. पोलिस घटनास्थळी आल्यावर वाहतुक सुरळीत केली. नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. भयकंर अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.