Jawaharlal Nehru Stadium Tent Collapse: जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील पंडाल कोसळला; 8 हून अधिक लोक जखमी, (Watch Video)
जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या एंट्री गेट क्रमांक-2 वर एक पंडाल कोसळला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. गेट क्रमांक 2 जवळील लॉनमध्ये काम सुरू असून बांधकामादरम्यान एक भाग पडला आहे. या अपघातात 8 हून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
Jawaharlal Nehru Stadium Tent Collapse: जवाहरलाल नेहरू स्टेडियम (Jawaharlal Nehru Stadium) च्या गेट क्रमांक दोनजवळ एक पंडाल कोसळला असून त्यात अनेक लोक गाडले गेल्याची भीती आहे. बचावकार्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या एंट्री गेट क्रमांक-2 वर एक पंडाल कोसळला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. गेट क्रमांक 2 जवळील लॉनमध्ये काम सुरू असून बांधकामादरम्यान एक भाग पडला आहे. या अपघातात 8 हून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. पंडाल कोसळल्याने काही लोक गाडले गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सकाळी 11.35 च्या सुमारास अपघाताची माहिती पोलीस व इतर पथकांना देण्यात आली. त्यानंतर बचावकार्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पहा व्हिडिओ -
Delhi | More than 8 people injured after a temporary structure installed near Gate number 2 of Jawaharlal Nehru stadium collapses, say Police. Details awaited. pic.twitter.com/AeO7pLQq9I
— ANI (@ANI) February 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2024 12:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

