Mumbai Goa Express Accident: मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे रस्त्यावर अनेक वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी पहाटे साडे पाचच्या दरम्यान झाला. कुडाळ शहरालागून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवर झाला. अपघाताग्रस्त कारमधील प्रवासी निपाणी येथे जत्रेसाठी जात होते. कार ही सांवतवाडीच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. कार अनियंत्रित झाल्याने धडक लागली आणि भीषण अपघात घडून आला. (हेही वाचा- बुलंदशहरमध्ये कार कालव्यात पडली, 3 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता)
अपघाताची माहिती जवळच्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अपघात मृत्यू झालेल्यांचे शव रुग्णालयात दाखल केले आणि जखमीला रुग्णालयात उपचारासाठी नेले. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचे संपुर्ण नुकसान झाले आहे. अपघात मरण पावलेल्यांची ओळख अद्याप समोर आली नाही. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.