Bulandshahr Accident: बुलंदशहरमध्ये कार कालव्यात पडली, 3 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता
उत्तर प्रदेशातील बुलंद शहरामधील जहांगीर पूर पोलीस स्टेशन परिसरात कार कालव्यात पडल्याने ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारमधील तीन जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरु आहे. सीएम योगी यांनी या अपघाताची दखल घेतली आहे.
Bulandshahr Accident: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामधील जहांगीर पूर पोलीस स्टेशन परिसरात कार कालव्यात पडल्याने 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारमधील तीन जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरु आहे. सीएम योगी यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. एडीएम प्रशांत कुमार यांनी सांगितले की, कारमध्ये एकूण 8 लोक होते आणि ते बुलंदशहरच्या शेरपूर गावातून अलीगढ पिसावा लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान, त्यांची कार अनियंत्रित होऊन कपना कालव्यात उलटली, त्यामुळे हा अपघात झाला. आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित 3 जणांचा शोध सुरू आहे. एसडीआरएफ आणि इतर पथके शोधकार्य सुरु आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे.
#WATCH बुलंदशहर, उत्तर प्रदेश: एडीएम प्रशांत कुमार ने कहा, "शेरपुर गांव के निवासी किसी वैवाहिक समारोह के लिए जा रहे थे लेकिन दुर्भाग्यपूर्ण उनकी गाड़ी एक नहर में गिर गई। हमें रात में 3 लोगों का शव मिल चुका था और बाकि लोगों की तलाशी जारी है।SDRF और अन्य टीम तलाश में लगे हुए हैं।… https://t.co/qPZkTz6mKC pic.twitter.com/aEY94HLZkm
— ANI_HindiNews (@AHindinews) March 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2024 09:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

