Mumbai News: आंतरराष्ट्रीय परमिट अर्जावर स्वाक्षरी करण्याच्या वादातून अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकाऱ्याला (RTO) मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हनीफ मकवाना, समीर मकवाना आणि आदिल मकवाना अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. गुमास्ते आंतरराष्ट्रीय परवानग्यांशी संबंधित कागदपत्रांची छाननी, पडताळणी आणि स्वाक्षरीसाठी जबाबदार आहेत. त्याच्याशी ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, खाजगी व्यक्ती आणि एजंट संपर्क साधतात. (हेही वाचा- बॉयफ्रेंडने नात्यात फसवणूकीच्या संशयावरून प्रेयसीचा घेतला जीव; )
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये, हनीफ मकवाना हे सहा आंतरारष्ट्रीय परमिट अर्ज घेण्यासाठी आले होते. गुमास्ते यांनी स्वाक्षरी करण्यापुर्वी कागदपत्रे तपासण्याचा आग्रह धरला, यावरून वाद झाला. मकवाना यांनी अधिकाऱ्यासोबत असभ्य वर्तन केले अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर दोन साथीदारांनी बुक्कीने मारहाण केली आणि बेल्ट काढून पायावर मारलं. येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मकवाना यांनी त्यांची कागदपत्रे मंजूर करण्याचा आग्रह धरला, अन्यथा गुमास्थे यांना काम करू देणार नाही.
जखमी गुमास्ते यांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाकल केली. तिन्ही आरोपींविरुध्द प्राणघात हल्ला, हेतुपुरस्सर अपमान, धमकावणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही बुधवारी अंधेरी येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.