Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

जुईनगर (Juinagar) मध्ये एका खाजगी बॅंकेमध्ये काम करणार्‍या बॅंक मॅनेजरची बॉयफ्रेंड कडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तुर्भे (Turbhe) मध्ये एका लॉजवर नेऊन तिचा खून करण्यात आला आहे. आरोपी 24 वर्षीय शोएब शेख आहे. शोएब 35 वर्षीय महिलेला डेट करत होता. सोशल मीडीयावर त्यांची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. शोएबला अमित कौर ही महिला त्याच्यासोबत चिटिंग करत असल्याचा संशय आला होता. त्या संशयातून त्याने तिचा खून केला आहे. 8 जानेवारीला वाढदिवसाचं औचित्य काढत त्याने तिला बाहेर बोलावलं आणि खून केला.

साकीनाका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपीने खूनाची कबुली दिली असल्याचं वृत्त TOI ने दिले आहे. सोमवारी कौर आणि शेख यांची भेट झाली. कामानंतर ते दोघे बर्थ डे सेलिब्रेशनसाठी गेले. रूम बूक करण्यासाठी त्यांनी आपली आयकार्ड्स देखील वापरली. मध्यरात्री शेखने चेकआऊट केले. लॉजच्या स्टाफला त्याचा संशय तेव्हा आला नाही. मात्र पोलिसांनी जेव्हा रूमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना कौर मृतावस्थेमध्ये आढळली. Pune Crime Case: पुण्यात बापाचं निर्घृण कृत्य! घरी कोणी नसताना सावत्र मुलीवर केला बलात्कार, आरोपीला अटक.

शेख लॉज वरून साकीनाका मध्ये त्याच्या घरी गेला. त्याच्या नातेवाईकाच्या गॅरेजमध्येच तो काम करत होता. पोलिसांना एका व्यक्तीने शेख कडून काहीतरी चूकीचं घडलं असल्याची टीप मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आणि त्याने खूनाची कबुली दिली. तुर्भे पोलिसांकडून शेखवर 302 (murder)कलम ठोकण्यात आला आहे.

मृत महिला आईसोबत जीटीबी नगर मध्ये राहत होती. ती घटस्फोटित असून तिची किशोरवयीन मुलगी वडिलांसोबत राहत आहे.