Shivajirao Adhalarao Patil: एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धमकी, 17 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल
Shivajirao Adhalarao Patil (Photo Credit - Facebook)

शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिंदे गटात सहभागी होताच शिवाजीराव अढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी आली आहे. धमकी प्रकरणामुळे खेड पोलिसांत (Khed Police) 17 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले 17 जण हे शिवसैनिक असल्याची माहिती आहे. आढळराव हे शिंदे गटात सहभागी झाल्याने शिरुर येथील शिवसैनिकांमध्ये संतप्त भावना आहे. संतप्त शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांच्या विरोधात नुकतेच आंदोलनही (Agitation) केलेहोते.

शिवाजीराव आढळरा पाटील यांच्या विरोधात संतप्त शिवसैनिक अद्यापही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने करत आहेत. त्यामुळे आढळराव समर्थक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Chitra Wagh on Nana Patole: काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं? चित्रा वाघ यांनी पोस्ट केला नाना पटोले यांचा व्हिडिओ)

गुन्हा दाखल झालेले शिवसैनिक (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड)

 • गणेश सांडभोर
 • राम गावडे
 • महेंद्र घोलप
 • अमोल विटकर
 • सचिन पडवळ
 • निलेश वाघमारे
 • कुमार ताजणे
 • गोरक्ष सुखाळे
 • सुरेश चव्हण
 • शंकर दाते
 • नवनाथ कोतवाल
 • काका कुलकर्णी
 • दत्ता भांबुरे
 • तुषार सांडभोर
 • बबनराव दौंडकर
 • चंद्रकांत भोर
 • बाजीराव बुचडे

दरम्यान, शिवसैनिकांनी राजगुरुनगर येथे पुणे नाशिक महामार्गावर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी आढळराव पाटील यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावण्यात आला. या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच आढळराव पाटील यांचा फोटो असलेल्या गाढवाला चपलांचा हार घातला. या वेळी काही अतिउत्साही कार्यकर्ते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या घरी गेले. त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी दिली. यावरुनच खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.