भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शेअर केलेली ही पोस्ट त्यांनी नाना पटोले, मुंबई प्रदेश काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस यादी ट्विटर हँडललाही टॅग केली आहे. तसेच पोस्टमध्ये 'काय नाना.. तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं?', असा सवालही विचारला आहे. चित्रा वाघ यांच्या या व्हिडिओ पोस्टमुळे सोशल मीडियात नेटकऱ्यांनी ट्रोलींग सुरु केले आहे.
नाना पटोले यांच्याशी साधर्म्य असलेली एक व्यक्ती चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत पाहायला मिळते आहे. ही व्यक्ती एका हॉटेलसदृश्य इमारतीत बसली आहे. ही व्यक्ती ज्या हॉलेलमध्ये बसली आहे. त्या हॉटेलमध्ये या व्यक्तिच्या कुशीत खुर्चीवर बसलेली एक महिलाही दिसत आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. वास्तव पाहता हॉटेलमध्ये महिलेला कुशीत घेतलेली व्यक्ती नेमकी कोण आहे याबाबत कोणताच उलघडा होत नाही. व्हिडिओत नाना पटोले यांचा एक फोटो मात्र स्वतंत्र दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की मॉर्फ केलेला याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. (हेही वाचा, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप, महिलेची साकीनाका पोलिसांत लेखी तक्रार दाखल)
चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमठत आहेत. नाना पटोले यांना ज्या पद्धतीने ट्रोल केले जात आहे. तसेच, चित्रा वाघ यांच्यावरही टीका होते आहे. नाना पटोले यांचा हा कथीत व्हिडिओ खासगी आहे. त्यांनात्यांचे खासगी जीवन जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे असे व्हिडिओ शेअर करणे चुकीचे आहे, असे नेटीझन्सचे म्हणने आहे.
ट्विट
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
दरम्यान, नाना पटोले यांनी या व्हिडिओद्वारे केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, आपली प्रतिमा मलीन करणे आणि बदनामीच्या हेतूनेच हे व्हिडिओ पसरवले जात असल्याचे म्हटले आहे. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.