Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

काही समस्यांवर चर्चा करण्यासाठी मी काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटलो. ते माजी मुख्यमंत्री असून सध्या विरोधी पक्षनेते आहेत. तसंच बिहार निवडणूकीत भाजप पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आमच्या काही वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. तसंच या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांनी होती, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. (माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भेट; 2 तास चर्चा, समोर आले 'हे' कारण)

काल संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यात राजकीय भुकंप येणार का? जुने मित्र पुन्हा एकत्र येणार का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या भेटीमुळे हे भेट झाली का? अशा चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र आज खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य करुन चर्चांवर पडदा पाडला आहे. दरम्यान, ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली असल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल ट्विटद्वारे स्पष्ट केले होते.

ANI Tweet:

 

काल अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांनी एनडीए मधून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यावरुनही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

"अकाली दल आणि शिवसेना एनडीएचे मजबूत स्तंभ होते. शिवसेनेला मजबूरीने एनडीएतून बाहेर पडावे लागले होते. आता अकाली दलही बाहेर पडले आहे. एनडीएला आता नवे साथीदार मिळाले आहेत. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्यात शिवसेना आणि अकाली दल नाही ते एनडीए मी मानत नाही," असेही संजय राऊत म्हणाले.