गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला हा निर्णय; मुंबई ते कोकण या दरम्यान 2 विशेष रेल्वे धावणार
Railway | प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

गणेशोत्सवाच्या निम्मिताने रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने मुंबई ते कोकण (Mumbai to Kokan) दरम्यान 2 विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवात मुंबई ते कोकण तसेच कोकणतून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आढळते. रात्री उशिरानंतर मुंबईहून कोकणाकडे जाणारी गाडी नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांना योग्य वेळी रेल्वेची सुविधा मिळावी , यासाठी रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

उत्सव काळातील गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chatrapati Shivaji Terminous) ते रत्नागिरी (Ratnagiri) मार्गावर दोन विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी 8 सप्टेंबर रोजी ही विशेष रेल्वे सीएसएमटीहून रात्री 12:30 मिनिटांनी सुटणार असून रत्नागिरी येथे सकाळी 10 वाजता पोहचेल. हे देखील वाचा-मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील 8 सप्टेंबरचा मेगा ब्लॉक रद्द; भक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत विशेष लोकल

कोकणाकडून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येथे येणारी रेल्वे सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. सीएसएमटी स्थानकात दुसऱ्या दिवशी 5 वाजता ही रेल्वे पोहचेल. शनिवार 7 सप्टेंबरपासून या ट्रेनचे आरक्षण सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. तसेच मुंबईतही रविवारी 7 सप्टेंबर रोजी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिन्ही रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक (MegaBlock) रद्द केले आहेत.