Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

रविवारी 7 दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची (Passenger) गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिन्ही रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक (MegaBlock) रद्द केला आहे. तसेच मुंबई (Mumbai) गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत विशेष लोकल सुरु ठेवण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील गणेश मंडळाला (Ganesh pandals) भेट देण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची अडचण कमी होणार आहेत.

गणेशोत्सवामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) मेन आणि हार्बर (Harbour Line) मार्गावर घेण्यात येणारा रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी दिली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी नियमित घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे देखील वाचा-पालघर: रेल्वेस्थानकात प्रकृती बिघडलेल्या वृद्धाच्या मदतीसाठी रिक्षा फलाटावर, पण चालकावर गुन्हा दाखल

या दरम्यान मध्य रेल्वेकडून छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस (Chatrapati Shivaji Maharaj Terminous) ते ठाणे (Thane)/कल्याण (Kalyan) या मार्गांवर रात्री ३.३० पर्यंत लोकल सुरु ठेवली जाईल. छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस ते पनवेल या मार्गांवर २.४५ मिं शेवटची लोकल धावणार. गणेश विसर्जनादरम्यान पश्चिम रेल्वेवरही (Western Railway) शनिवारी रात्री चर्चगेट-विरार मार्गावर ४ विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेटहून शेवटची विशेष लोकल पहाटे ३.२० विरारसाठी तर, विरारहून शेवटची विशेष लोकल पहाटे ३ वाजता सुटेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली.