पालघर: रेल्वेस्थानकात प्रकृती बिघडलेल्या वृद्धाच्या मदतीसाठी रिक्षा फलाटावर, पण चालकावर गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पालघर (Palghar) येथे रेल्वेस्थानकात प्रकृती बिघडलेल्या वृद्धाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी चक्क रिक्षा फलाटावर आल्याचा प्रकार समोर आला. पण माणूसकी म्हणून मदत करण्यासाठी धावून गेलेल्या या रिक्षाचलाकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर रिक्षाचालकर संघटनेने पुढाकार घेत दाखल करण्यात आलेल्या गुन्हाच्या विरोधात प्रश्न उपस्थित केला आहे.

रेल्वेस्थाकातून जात असलेल्या एका वृद्धाची प्रकृती बिघडल्याने प्लॅटफॉर्वर चक्क रिक्षाने धाव घेतली. त्यानंतर रिक्षामधून त्या वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु सुरक्षा बलाने रिक्षाचलाकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.(मुंबई: विरार प्लॅटफॉर्मवर गर्भवती महिलेला घेऊन जाण्यासाठी चक्क रिक्षाची धाव Watch Video)

मात्र रिक्षाचालकाने कर्तव्यदक्षता दाखवून वृद्धाला मदत केली खरी पण त्याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रिक्षा संघटनेने माणूसकी म्हणून मदत करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणे ही चुकीची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच रेल्वेस्थानकात नागरिकांसाठी सर्व सुविधा असणे महत्वाचे असणे असे रिक्षाचालकाचे म्हणणे आहे.