
ठाण्यामध्ये 32 वर्षीय मुलीने गळफास (Suicide) घेत स्वतःचं जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ केला आहे त्यामध्ये आपल्या आत्महत्येला बॉयफ्रेंड आणि त्याचेनातेवाईक जबाबदार असल्याचं तिनं म्हटल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
सचिन शास्त्री, रवी शास्त्री आणि पूजा वाघमारे हे उल्हारनगरचे राहिवासी आरोपींमध्ये आहेत. मृत महिलेचं नाव सुमन शेडगे आहे. 32 वर्षीय सुमन कल्याण मध्ये राहत होती. एफआयआर नुसार, तक्रार मृत मुलीच्या आईने केली आहे. सचिनचे सुमन सोबत रोमॅन्टिक संबंध होते. 10-15 वर्ष नात्यामध्ये असल्याने त्याचे सुमनच्या घरी वरचे वर येणं जाणे होते असे सुमनच्या आईने सांगितले आहे. त्याने मुलीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं पण नंतर तो पळवाटा शोधू लागला. पुढे त्याने सुमन वर अभद्र भाषेत टीका करणं, तिला मारहाण करणं सुरू केलं.
सचिनची बहीण पूजा आणि भाऊ रवि यांच्यावरची अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप केला आहे. सचिन दुसर्या मुलीशी लग्न करेल पण त्याच्याशी नाही असं म्हटलं. पाच वर्षापूर्वी दुसर्या मुलीशी विवाहबंधनात अडकला असतानाही त्याने घरी येऊन सुमनला लग्नाचं वचन दिल्याचं FIR मध्ये आहे.
28 फेब्रुवारी रोजी सुमन सचिनला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला असता, त्याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर ती घरी परतली आणि तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आईला मुलगी लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसली. त्यानंतर तिला तात्काळ सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३(५) अन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्येपूर्वी एकदा मदत घ्या
Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.Mumbai nightlife