Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Thane: कल्याण येथील एक तरुण उद्योगजक काही जणांसोबत सातारा येथे गेला होता. मात्र त्यानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी अधिक तपास केला असता जवळजवळ 10 दिवसांनी या तरुणाचा मृतदेह सातारा येथे आढळून आल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.(Vasai: भुईगाव बीचजवळ समुद्रात तरंगताना दिसली कार; मालकाचा शोध सुरु Watch Video)

संदीप कदम असे तरुणाचे नाव असून तो उद्योजक होते. तर 20 डिसेंबरला संदीप हा कुठे बेपत्ता झाला याचा कोणालाच माहिती नव्हते. त्यानंतर 29 डिसेंबरला साताऱ्यातील वाई मधील मांढरादेवी मंदिरापासून जवळ असलेल्या एका दरीत कदम याचा मृतदेह आढळला. त्यावेळी संदीप याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्याचे दिसून आले. स्थानिकांनी याबद्द पोलिसांना कळवले असता संदीप याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिला गेला.(Bhusawal: अनैतिक संबंधातून तरूणाची हत्या करून रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतदेह; जळगावच्या भुसावळ येथील घटना)

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता राज्यातील विविध पोलीस स्थानकात अशा वर्णनाची व्यक्ती बेपत्ता आहे का या बद्दल अधिक चौकशी केली. त्यावेळी कल्याण मधून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी संदीप यांचे अपहरण केल्यानंतर हत्या केल्याचे स्पष्ट झाले.  यामध्ये दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मात्र संदीप यांची हत्या कोणत्या कारणास्तव केली गेली हे स्पष्ट झालेले नाही.