मुंबई (Mumbai) पाठोपाठ आता राज्यातील विविध (Aurangabad) जिल्ह्यात देखील गोवरने (Measles) तोंड वर काढलयं. अनेक बालकांचा गोवरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह (Measles Report Positive) आला आहे. तरी काही संशयित रुग्ण देखील आढळून आले आहेत. राज्यात गोवर रुग्णसंख्येत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.लहानग्यांना होत असलेल्या गोवरच्या लागणमुळे पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सुचना दिल्या आहे तसेच भीती बाळगण्यापेक्षा योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून (Health Department) करण्यात आले आहे. अंगावर लाल पूरळ, ताप, लाल डोळे असी लक्षण आढळून आल्यास आपल्या पाल्यांना लवकरात लवकत रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गोवरवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी एक तातडीची बैठक बोलवण्यात आली होती.

 

राज्यातील सर्व प्रमुख आरोग्य विभागातील अधिकारी आणि महापालिका आयुक्त या बैठकीस हजर होते. या बैठकीत ताबडतोब आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले. गोवरच्या लसीकरणास (Vaccination) सुरुवात केली आहे. गोवर (Measles) आजारावर कुठलाही औषधी उपचार नसल्याने केवळ लसीकरण (Vaccination) हाच एकमेव रामबाण उपाय आहे. तरी तुम्ही तुमच्या पाल्यास गोवर लस न दिल्यास ती ताबडतोब द्यावी असे वाहन आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. (हे ही वाचा:- Measles Report: एका गोवरच्या रुग्णाकडून तब्बल 18 रुग्णांना होवू शकते लागण, WHO कडून विशेष सुचना जारी)

 

मुंबई (Mumbai) नंतर आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) गोवरचे रुग्ण बघता राज्यभरात (Maharashtra) गोवरची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसेनदिवस रुग्ण संख्येत वाढ बघायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health Mistry Of India) महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयास विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील एक विशेष पत्रक काढत गोवर आजाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.