Nagpur Police Suicide: नागपूर पोलिसाची आत्महत्या, कारण अस्पष्ट, तपास सुरु
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Nagpur Police Suicide: पुण्यात एका पोलिस हवालदाराने ऑन ड्युटी स्वत: आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना  नागपूर शहरात देखील अशीच घटना घडली आहे. नागपूर येथील एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिस कर्मचाऱ्याने एसएलआर बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- ऑव्हरटेक करताना कारची धडक बाईकला, अपघातात पाच जणांचा मृत्यू,

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील पोलिस दलात काम करणाऱ्या एका पोलिसाने आत्महत्या केली. मंगेश मस्की असं मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगेश हे नागपूर येथील वाडी पोलिस ठाण्या अंतर्गत सुराबर्डी येथील पोलिस अपारंपारिक प्ररिक्षण केंद्रात कार्यरत होते. या घटनेनंंतर पोलिस ठाण्यात शोक पसरला आहे.

मंगेश यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. त्यादेखील वाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. शनिवारी सायंकाळी मंगशे यांच्या जवळ असलेली एसएलआर बंदूक ठेऊन घेतली होती. त्याच बंदूकीने स्वत:वर गोळीबार केला. डोक्यातून गोळी आरपार गेली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारचा आवाज ऐकून पोलिस ठाण्यात उपस्थित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना मंगेश यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसला. पोलिसांना त्यांना रुग्णालयात दाखल केले पंरतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांने आत्महत्या का केली अशीच खळबळ परिसरात आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे.