Nashik Road Accident: ऑव्हरटेक करताना कारची धडक बाईकला, अपघातात पाच जणांचा मृत्यू, नाशिक रोडवरील घटना
Accident (PC - File Photo)

Nashik Road Accident: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीजवळ (६ एप्रिल) शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे अशी माहिती समोर आली आहे. एसयुव्ही कारची मोटारसायकलला धडक लागली. ही धडक जोरात लागल्याने मोठी दुर्घटना घडली.  या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा-  नवले पुलावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, तीन वाहनांची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, एसयुव्ही कार तीर्थक्षेत्र वणी येथून नाशिकच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या एसयुव्ही कारचे नियंत्रण सुटल्याने आणि पुढून विरुध्द दिशेने जाणाऱ्या मोटारसायकला धडकली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडालाही धडकली. दुपारच्या दोन वाजता हा अपघात घडला आहे.  या भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

अपघातस्थळी पाच जणांचा जागीची मृत्यू झाला. अधिकाऱ्याने माहिती दिली की, कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात मोटरसायकलवरील अनिल बोडके व त्यांचा मुलगा राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही जिल्ह्यातील निफाड येथील रहिवासी होते.

एसयूव्ही कार मध्ये मुकेश कुमार यादव (25), अमन रामकेश यादव (18) आणि कुसुमदेवी रामकेश यादव (45) या नाशिक येथील कुटुंबातील सदस्यांचा अपघातात मृत्यू झाला.तर अन्य तीन जण जखमी झाले. घटनास्थळी पोलिस पुढील चौकशी आणि तपासणी करत आहे.