घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींत घट, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शुक्रवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनुदानित गॅस सिलिंडरसाठी 1.46 रुपयांनी कपात केली असून विनाअनुदानित सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. राज्यात मध्यरात्रीपासून हे नवीन दर गॅस सिलिंडरसाठी लागू करण्यात आले आहेत.

नवं वर्षाच्या सुरुवातीला देशातील सर्वसामान्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली होती. तेव्हा1 जानेवारी 2019 पासून गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 120.50 रुपये केल्या. तसेच अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 5.91 रुपयांनी कमी केली होती. (हेही वाचा-1 जानेवारी 2019 : नवं वर्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट)

सध्या दर कमी केल्याने 14.2 किलोचा अनुदानित सिलिंडर 500 रुपयांऐवजी आता 494.99 रुपये ग्राहकांना मोजावे लागत होते. तर विनाअनुदानित सिलिंडरसाठी 120.50 रुपयांच्या किंमतीत घट केल्याने आता 809. 50 रुपयांचा सिलिंडरसाठी ग्राहकांना फक्त 689 रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबत भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कडून ही माहिती देण्यात आली आहे.