1 जानेवारी 2019 :  नवं वर्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट
LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

नवं वर्षात देशातील सर्वसामान्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली असून 1 जानेवारी 2019 पासून गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 120.50 रुपये केले आहे. तसेच अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 5.91 रुपयांनी कमी केले आहे.

सरकारने गॅसच्या किंमती कमी केल्याने तो 493.38 रुपयांऐवजी 493.38 रुपयांना विकत घेता येणार आहे. तसेच 809.50 रुपयांचा विनाअनुदानित सिलिंडर 689 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सरकारने घेतलेल्या गॅसच्या सिलिंडरच्या किंमती बाबत निर्णयामुळे गॅसची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. (हेही वाचा- गॅस सिलेंडर दरवाढ : विना अनुदानित गॅस सिलेंडरही महागला, आजपासून LPG सिलेंडर 505.05 रुपये)

तसेच गेल्या वर्षात सरकारने गॅस वितरकांचे कमिशन वाढवल्याने गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी किंमत चक्क 60 रुपयांनी वाढवली होती. तर जागतिक बाजारात गेल्या वर्षात तेलाच्या किंमती कमी होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये घसरण झाली होती.