चीन येथे जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरून टाकले आहे. सध्या भारतातही कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दिल्ली येथील निझामुद्दीन परिसरातील मशदीत तबलीगी जमातीचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाने कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर टाकली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून (Maharashtra) 1400 लोकांनी उपस्थिती दाखवली होती. या लोकांपैकी 1350 जणांचा शोध घेतला आहे. मात्र, उर्वरित लोकांनी आपला फोन बंद करून ठेवल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. परंतु, हे लोक स्वत: हून समोर न आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार, असा सूचक इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी प्रसारमध्यमातून दिला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात मोठ्या संख्येत लोक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घरी परतले. त्यापैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील निरनिराळ्या भागातून या ठिकाणी लोक आल्याने त्यांना युद्धपातळीवर शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून 1400 लोक गेले होते. त्यापैकी 1350 लोकांचा शोध घेतला आहे. मात्र, 50 जण अद्यापही बेपत्ता आहेत. यामुळे अनिल देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान ते म्हणाले की, "तबलीगी जमातमधून परत आलेल्या 1400 लोकांपैकी 1350 जणांची चाचणी घेण्यात आली. तबलीगी जमातमधून महाराष्ट्रात परतलेले 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला आहे. यामुळे त्यांना शोधायला वेळ लागत आहे. परंतु, ते सर्वजण स्वताहून समोर न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे," असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच "जो कोणी पोलिसांशी गैरवर्तन करतो त्याला कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत अशी 55 प्रकरणे नोंदली गेली आहेत. आतापर्यंत180 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे". असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; केशरी शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार 'ही' सुविधा
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, "पोलिसांना पीपीई, मुखवटा, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. राज्याने केंद्र सरकारकडे 10 लाख एन 95 मास्क, व्हेंटिलेटर, पीपीईची मागणी केली आहे. जगभरात कमतरता आहे. "लॉकडाऊनवर ते म्हणाले," याचा आढावा घेतला जाईल. आवश्यक नसल्यास, आपण लॉकडाउन समाप्त केला जाईल.