राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; केशरी शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार 'ही' सुविधा

कोरोना विषाणूने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार कडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नुकतीच राज्य मंत्रीमंडाळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत नागरिकांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केशरी शिधापत्रिका (Saffron Ration Card Holders) धारकांना मोफत धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली होती. आशिष शेलार यांच्या मागणीला राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळाला असून एप्रिल ते जून महिन्यात केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे. केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पंतप्रधानांच्या मोफत धान्य योजनेप्रमाणे राज्याने स्वतंत्र योजना तयार करुन अन्नसुरक्षेचा शिक्का नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मोफत धान्य द्यावे. त्याचा खर्च आमदार निधीतून करावा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने हातावर पोट असलेल्या आणि गरीब गरजुंसाठी अन्नधान्याच्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. मात्र केशरी शिधापत्रिकाधारकांचाही राज्य सरकारने योग्य तो विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर आज पार पडलेल्या बैठकीत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील वाचा- जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मारहाण; वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय-

-राज्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना येत्या एप्रिल ते जून 2020 या कालावधीत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे.

- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा केली जाणार.

- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर विस्तार करून पुढील 3 महिने रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- तसेच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपाय योजनांची नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून महत्वाच्या उपाय योजना आखल्या जात आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. याशिवाय कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडॉऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत, असे बोलले जात आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.