कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदरीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉक़डाउन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रात 3 जूनपासून अनलॉकला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकल ट्रेन (Local Trains) सुरु करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली आहे. परंतु, केंद्र सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय झाला नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रावादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कर्तबगारीमुळे सध्या तरूण वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होताना दिसत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 21 वा वर्धापन दिन असून, मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करुन जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एका वृत्तवाहीनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची एक मोठी फौज मागच्या पिढीत होती. चालू पिढीतही आहेत आणि भविष्यातील तरूण पिढीसाठी देखील मोठ्या प्रमाणात आकर्षण आज राष्ट्रवादी पक्ष झालेला आहे. याच सगळ्यात मोठे कारण म्हणजे शरद पवार यांची या वयातही असणारी कर्तबगारी आहे. आज वादळामुळे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते कोकण दौऱ्यावर आहे. ज्या ठिकाणी संकट येथे तिथे शरद पवार असतात. याशिवाय, रेल्वे नसल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होत आहे. यामुळे मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करा, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. मात्र, केद्राकडून कोणताही निर्णय नाही, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारलं जाणार पंचतारांकित पर्यटन केंद्र; 'ताज' ग्रुपला भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा मंत्रिमंडळचा निर्णय
आतापर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जर अशी अपेक्षा केली नाहीतर पक्ष कसा पुढे जाईल’असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.