गेल्या वर्षिच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Employee Strick) झाला होता. राज्यभरात एसटी बंद होत्या. पण दिवस पलटलेत आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. तरी यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी (Diwali) अधिक गोड होणार आहे. कारण एसटी महामंडळाकडून (ST Mahamandal) कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना 5000 रुपये दिवाळी निमित्त वाढीव बोनस (Diwali Bonus) देण्यात येणार आहे. म्हणजे यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांची (ST Employee) दिवाळी गोड होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Governement) एसटी महामंडळास तब्बल 45 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तरी प्रत्येक कर्मचाऱ्यांस एसटी महामंडळाकडून प्रत्येकी 5 हजारांची दिवाळी भेट देवू करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचा फायदा महामंडळाच्या 87 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला 5 हजार रुपये दिवाळी (Diwali Bonus) भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा केली असल्याची माहिती एसटी महामंडळ (ST Mahamandal) व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली. (हे ही वाचा:- ST Bus Ticket Price Hike: ऐन दिवाळीत लाल परीचा प्रवास महागणार, एसटी तिकीटांचे दर 10 टक्क्यांनी वाढणार)
एसटी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आले असले तरी एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एसटी बसच्या तिकीट दरात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तिकीटांत होणार ही वाढ फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. दिवाळीच्या काळात एसटी बसेसला जास्त गर्दी असते. या गर्दीच्या हंगामामध्ये महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय हा पासधारकांना लागू नसणार आहे. मासिक आणि विद्यार्थी पासेसना (ST Bus Pass) ही भाडेवाढ लागू नाही.