विरारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला, अनेक लोक अडकून पडल्याची शक्यता
Image For Representation Building Collapsed (Photo Credits-Twitter)

मुंबईतील इमारती कोसळण्याच्या घटना सतत कानांवर येत आहेत. नुकतीच विरारमध्ये (Virar) कोपरी नित्यानंद नगर भागात एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून बचावकार्य. सुरु आहे. या इमारतीत अनेक लोक अडकून पडले आहेत.

विरारच्या कोपरी नित्यानंद नगर भागात असलेली ही इमारत 25 ते 30 वर्ष जुनी आहे. ही चार मजली इमारत असून याचा या भागातील अनधिकृत इमारत असल्याचे टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. या इमारतीत राहणारी 4 वर्षांची मुलगी तिस-या मजल्यावर खेळत असताना तिला बाल्कनीचा काही भाग कोसळत असल्याचे जाणवले.

हेदेखील वाचा- #Khar Building Collapse Update: खार मध्ये पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून पडली 10 वर्षीय चिमुकली

घटनास्थळी विरार अग्निशमन दलाची टीम दाखल झाली असून येथील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरु झाले. मात्र घटनेचे गांभीर्य पाहता या इमारतीत अनेक जण अडकून पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.