![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/1-621858075.jpg?width=380&height=214)
Solapur Accident: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (Mohol) तालुक्यात रविवारी भाविकांच्या एका बसचा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये (Solapur Accident) तिघांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे. देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावरील कोळेवाडी येथे हा अपघात घडला. (Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोड अपघात, नाशिक येथील तरुणीचा मृत्यू)
मिनी बस-कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू,15 जखमी
Maharashtra: A truck, mini-bus, and two-wheeler collided near Kolewadi on the Solapur-Pune highway, killing three people, including the mini-bus driver, and injuring 15 others. The truck veered into the wrong lane, causing the mini-bus to overturn. A case was registered pic.twitter.com/wezyiXrnwI
— IANS (@ians_india) February 10, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली. त्यानंतर हा कंटेनर राँग साईडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला. कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस पलटी झाली. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. (Jalgaon Train Accident: जळगावमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात नेपाळच्या 7 नागरिकांचा मृत्यू; नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाची माहिती)
यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.