Jalgaon Train Accident (फोटो सौजन्य - X/@TariqSyedA)

Jalgaon Train Accident: बुधवारी जळगाव (Jalgaon) येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात (Accident) नेपाळच्या सात नागरिकांच्या मृत्यू झाला. लखनौहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील (Pushpak Express) काही प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंगच्या घटनेनंतर ट्रेनमधून उडी मारल्याने या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले होते. 12533 लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमधील (Lucknow-Mumbai Pushpak Express) प्रवाशांना आग लागण्याच्या भीतीने त्यांनी लगतच्या रुळांवर उड्या मारल्या. त्यानंतर बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना चिरडले.

गुरुवारी, नेपाळचे परराष्ट्र मंत्री आरझू राणा देऊबा यांनी जळगाव येथे झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कृष्णा प्रसाद ढकाल यांनी सांगितलं की, अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह नेपाळला पाठवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय भारतातील संबंधित संस्थांशी समन्वय साधत आहे. (हेही वाचा -Pushpak Express Accident: परांडा रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस च्या प्रवाशांचा गंभीर अपघात; ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेतून बाहेर आलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं)

रेल्वे अपघाताची चौकशी सुरू -

दरम्यान, रेल्वे बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, पाच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकाने या रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळ नव्हता. तसेच त्यांच्याकडे रुळांवर उड्या मारण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही साखळी ओढण्याचे कारण तपासत आहोत, असे एका रेल्वे अधिकाऱ्यांने सांगितले.