Pushpak Express Accident | X

जळगाव (Jalgaon) जवळील परांडा रेल्वे स्टेशन जवळ एक मोठा अपघात झाला आहे. लखनऊ कडून मुंबईच्या दिशेने प्रवास करणार्‍या पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) मध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि काही प्रवाशांनी ट्रेन मधून उडी मारली. मात्र नेमकी तेव्हाच समोरून आलेल्या ट्रेनने या प्रवाशांना उडवले. एका अधिकार्‍याच्या माहितीनुसार, जळगाव मध्ये चेन पुलिंग नंतर पटरी वर आलेल्या दुसर्‍या ट्रेनने त्याला उडवले. यामध्ये 8 जण जखमी आहेत तर काही प्रवासी मृत असल्याचा अंदाज आहे.

ANI च्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेस मध्ये काही लोकांना आग लागल्याचे वाटले. त्यामुळे काही जण कोचच्या बाहेर उभे होते. तेव्हाच नेमकी समोरून कर्नाटक एक्सप्रेस आली आणि त्याने लोकांना उडवलं. दरम्यान या प्रकारानंतर तातडतोब रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

परांडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस येत असताना मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली. महिला व मुलांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांनाही काही काळ काहीच समजत नव्हते.

घाबरलेल्या लोकांनी डब्यातून उड्या मारायला सुरुवात केली. त्यांची संख्या 35 ते 40 असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरी ट्रेनही येत असल्याचे या प्रवाशांना दिसले नाही. त्यामुळे त्या एक्स्प्रेसचा धक्का प्रवाशांना बसला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. काही जण गंभीर जखमी झाले आहेत.