Mumbai Coastal Road |

मुंबई कोस्टल रोड अपघातात गार्गी चाटे या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते रस्तादुभाजकावर आदळले. ज्यामुळे वय वर्षे 19 असलेल्या गार्गी हिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात चालक संयम साकला (वय-22) याच्यावर अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन हाकल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघात घडण्यास चालकाने केलेले मद्यपाण कारणीभूत आहे किंवा नाही याबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. शिवाय वाहन हाकताना तो इतर कोणत्या नशेत होता किंवा नाही याबाबतही तपास सुरु आहे.

वेगमर्यादेचे उल्लंघन अपघातास कारण?

मुंबई कोस्टल रोड अपघात प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा चटे आणि साकला हे दोघे ‘स्विफ्ट’ कारने चर्चगेटच्या दिशेने मरीन ड्राईव्हला जात होते. वेगमर्यादेचे उल्लंघन हेच अपघातास कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हाजी आली जवळ वाहन ओव्हरटेक करताना चालकास अपयश आले आणि वाहन रस्तादुभाजकावर आदळले. ज्यामुळे ते जागीच उलटले आणि हा अपघात घडल्याचे पंचनामा करताना पुढे आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अपघात घडल्यानंतर चाटे आणि साकला या दोघांनाही ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चाटे हीस उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. चालक सकला यास गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा, Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात दोन कारची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत (Watch Video))

पीडित आणि चालकाची पार्श्वभूमी

अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, मुंबई कोस्टल रोड अपघातात बळी पडलेली, चाटे ही व्यवस्थापनाच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती, जी तिच्या अभ्यासासाठी नाशिकहून मुंबईला आली होती. नायर रुग्णालयात शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला, ज्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दादरचा रहिवासी असलेला साकला त्याच्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची तयारी करत होता. सुरुवातीच्या तपासणीत दारूचे सेवन झाल्याचे दिसून येत नसले तरी, निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा, Mumbai Coastal Road Opened: मुंबई कोस्टल रोड पूर्ण खुला; मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता अवघ्या 10-15 मिनिटांत)

अपघातानंतर ताडदेव पोलिसांनी सकलाविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 281 (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शिवाय, मुंबई कोस्टल रोडवर अपघात घडल्याचीह ही पहिलीच घटना आहे.