मुंबई मध्ये आज कोस्टल रोड पूर्णपणे नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. 76 व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या नॉर्थ चॅनल ब्रिजचे उद्घाटन केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस एक विटेंज कार देखील चालवताना दिसले. फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)