Social Media Troll Eknath Shinde Faction: सासुमुळे वाटणी केली अन् सासुच वाट्याला आली!, अजित पवार यांना अर्थखाते मिळाल्यावर शिंदे गट ट्रोल
Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Eknath Shinde Cabinet Expansion:राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मध्येच लटकलेले अजित पवार (Ajit Pawar) गटाचे खातेवाटप अखेर मार्गी लागले. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Faction) सोशल मीडियावर भलताच ट्रोल होऊ लागला आहे. अजित पवार यांच्याकडे गेलेले अर्थमंत्रीपद हे शिंदे गट ट्रोल होण्याचे प्रमुख कारण आहे. शिवसेना पक्षात बंड आणि मविआ सरकारमधून बाहेर पडताना शिंदे गटाने अजित पावर यांचे अर्थमंत्रीपदच कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने सांगितले होते. अर्थमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवारांनी निधीवाटपात असमानता केली. ज्यामुळे सत्ता आणि मुख्यमंत्री पद असूनही शिवसेना आमदारांच्या हाती काहीच लागले नसल्याचा दावा केला जात होता. मात्र, ज्या कारणामुळे मविआ सरकार पाडले आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले तेच कारण पुन्हा डोक्यावर बसले आहे. त्यामुळे सासुसाठी वाटून घेतलं आणि सासूच वाट्याला आली अशी अवस्था शिंदे गटाची झाल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

खास करुन एकनाथ शिंदे गटातील भरत गोगावले आणि संजय शिरसाट हे दोन आमदार अधिक ट्रोल होत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तर हेची 'अर्थ काय मम तपाला' असे म्हणत शिंदे गाटवर खोचक बाण सोडला आहे. काहीनी तर गोगावले यांना ट्रोल करताना 'शिवलेली सफारी वाया जाऊ नये म्हणून गोगावले होणार बिरवाडीचे राज्यपाल' असे म्हटले आहे. सोशल मीडियावरील काही ट्विट्स इथे वाचकांसाठी. (हेही वाचा, Ajit Pawar Got Finance Ministry: अजित पवार यांनी स्वीकारला अर्थ मंत्रालयाचा पदभार, वाचा सविस्तर)

'हाची 'अर्थ' काय मम तपाला'

'शिरसाट, बच्चू कडू, गोगावलेंसाठी विशेष सहानुभूती'

'दुःख बघवत नाही यांचं'

'दादा निधी देता का निधी'

'शिवलेला सफारी'

'नियतीने दिलेला पहिला झटका'

'अर्थ'हीन भासे मजला

दरम्यान, राज्याची मंत्रीमंडळ यादी खालील प्रमाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार:  यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे – कृषि

सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत- उद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

दरम्यान, अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांना पहिल्याच दिवशी मंत्रिपदे आणि त्यानंतर अवघ्या काहीच काळात मनासारखी खाती मिळाली आहेत. त्यामुळे शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचे समजते. काही आमदारांनी अप्रत्यक्षरित्या ही नाराजी बोलूनही दाखवली आहे. काही लोक तर इंटरनेटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोबाईल नंबर शोधू पाहात आहेत. काहींना वाटते एकनाथ शिंदे व्हाट्सअप नंबर शोधून त्यांना त्यांना मनातील भावना कळवाव्यात.